मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
Vatvatkaar
1 Listener
All episodes
Best episodes
Seasons
Top 10 मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) Episodes
Goodpods has curated a list of the 10 best मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) episodes, ranked by the number of listens and likes each episode have garnered from our listeners. If you are listening to मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) for the first time, there's no better place to start than with one of these standout episodes. If you are a fan of the show, vote for your favorite मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) episode by adding your comments to the episode page.
S2.E3 - व्हायरल नव्हे, व्हायटल - विनायक पाचलग बरोबर
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
01/30/22 • 44 min
तुम्ही जगाकडे कोणत्या खिडक्यांमधून पाहता?
काही सेकंदाचे, काही मिनिटांचे व्हायरल होणारे व्हिडीयो, शे-दोनशे अक्षरांतल्या प्रतिक्रिया, सतत माहितीचे विस्कळीत किंवा अनावश्यक असे तुकडे घेऊन घेणार्या ब्रेकिंग न्यूज आणि कमी कमी होत चाललेला आपला अटेन्शन स्पॅन... यात क्षणभर थांबून विचार करून, विश्लेषण करून या माहितीच्या तुकड्यांची सांगड घालून आजूबाजूचे जग समजावून घ्यायला जमतय का आपल्याला?
काहीही चटपटीत आणि बथ्थड गोष्टी “व्हायरल” करण्याच्या शर्यतीत भाग न घेता शांत आणि संयत “व्हायटल” (सकस) विश्लेषण करणारे “थिंकबॅंक” हे यूट्यूब वरचे एक दर्जेदार मराठी चॅनल. आजुबाजूस होत असलेल्या राजकिय, सामाजिक आणि आर्थिक स्थित्यांतरे याकडे सापेक्ष नजरेतून बघत आपल्या जगण्याशी थेट भिडणाऱ्या या डिजीटल चॅनलचा संपादक विनायक पाचलग मेतकूट पाॅडकास्ट वर गप्पा मारायला आज आपल्या सोबत आहे.
जाणून घेऊया त्याचा आणि थिंकबॅंकचा आजपर्यंतचा प्रवास.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
या भागामध्ये आलेले संदर्भ,
1. https://www.goodreads.com/book/show/53452906-ten-lessons-for-a-post-pandemic-world
2. https://www.goodreads.com/book/show/54828853-deep-fakes-and-the-infocalypse
3. https://www.goodreads.com/book/show/55987594-jugalbandi
4. https://www.goodreads.com/book/show/60129018-raoparva
5. Amit Verma’s podcast https://seenunseen.in/
6. Advertising is dead: https://shows.ivmpodcasts.com/show/advertising-is-dead-RxHPjV6WU3QJURnD
7. Filter Coffee: https://shows.ivmpodcasts.com/show/the-filter-koffee-podcast-REzRDso5YvWdg9XE
8. https://the-ken.com
1 Listener
1 Comment
1
S2.E2 - भाषेच्या नावानं चांगभलं
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
01/23/22 • 106 min
मातृभाषा हा खूप मजेशीर विषय आहे. शाळा होती तोपर्यंत भीती वाटायची आणि शाळा सोडल्यावर अभिमान वाटू लागला. मग आता "आपली" भाषा टिकावी, वाढावी, समृद्ध व्हावी या हट्टापायी भलेबुरे प्रयत्न आपण करतोच की. हे आत्ताच असं नाही. हे पूर्वापार चालत आलंय. पण भाषेच्या वृद्धीसाठी भाषेवर प्रेम परता आलं पाहिजे हेच खरं. मग ती स्वतःची असो, किंवा दुसऱ्याची.
तुम्हाला काय वाटतं?
शुद्ध-अशुद्ध भाषा, लिपी, व्याकरण, दुसर्या भाषेतून आलेले शब्द, भाषेतून वाहणारी संस्कृती, परंपरा, अस्मिता असा हा सगळा भाषेचा नुसताच पसारा आहे की भाषेचे सौंदर्य वाढविणारा पिसारा आहे? एक विषय म्हणुन शाळेत शिकण्यात, नंतर भाषा टिकवण्यात आणि त्याच्या राजकारणात भाषेतील गम्मत समजायची राहून जाते का?
आजच्या या भागामध्ये आम्ही या सगळ्यांमधल्या गंमतींवर गप्पा मारलेत. वेगवेगळ्या भाषेतील भन्नाट किस्से, आणि त्यातले बारकावे सांगायला आमच्यासोबत आहे अर्निका परांजपे.
अर्निकाची लेटेस्ट आणि आमच्या आवडीची ओळख म्हणजे तिचं "बांधणीच्या कविता" हे युट्युब चॅनेल. तिथे ती मराठी कवितांच्यातलं "मीटर" आणि ताल हे सगळं उलगडून सांगते. तिच्या चॅनेलला भेट दिला नसाल, तर आवर्जून द्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
या भागामध्ये आलेले संदर्भ:
१. https://timesofindia.indiatimes.com/life-style/spotlight/different-languages-spoken-by-the-british-royal-family/photostory/80214184.cms?picid=80214200
२. रोमन लिपीत लिहिलेल्या बॉलिवूडच्या पटकथा
३. https://en.wikipedia.org/wiki/Eliezer_Ben-Yehuda
५. सफरचंद
६. माधव ज्युलियन यांची छंदोरचना
७. सुनीता देशपांडेंचे कविता वाचन भाग १, भाग २
९. Why is Manike Mage Hithe so catchy?
११. रुडयार्ड किपलिंगची "If" कविता
१२. https://www.theguardian.com/books/2020/sep/10/when-we-cease-to-understand-the-world-by-benjamin-labatut-review-the-dark-side-of-science
१३. बहादूर अलास्त याचं युट्युब चॅनल : पोर्तुगीज आणि मराठीतली साम्य / संस्कृत आणि पर्शियन मधील साम्य
1 Listener
S1.E11 - पहिल्या आवृत्तीची सांगता, पुन्हा भेटूच
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
12/26/21 • 38 min
तर याप्रकारे मेटकूटच्या पहिल्या आवृत्तीची आज सांगता करत आहोत. त्यासाठी गेल्या दहा आठवड्यांचा हा धावता आढावा. पुढच्या आवृत्तीची तयारी जोरात सुरू आहेच. थोडी पाहुणे मंडळी, थोडं वेगळं ठिकाण, आणि तुमचे नेहमीचेच वटवटकार घेऊन आम्ही काही आठवड्यात परत प्रकट होऊच. पण तोपर्यंत, तुमचं प्रेम असंच देत राहा. आपल्या मित्र मैत्रिणींना या पॉडकास्ट बद्दल सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचावा. आता हे मेतकूट जमू लागलंय.
बाकी, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि सुरक्षित राहा. काळजी घ्या. हे सांगायला नकोच.
Please subscribe and share.
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
1 Listener
S2.E6 - आज खानेमें क्या है? - प्रीती आणि राजेश सोबत गप्पा
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
02/20/22 • 126 min
अन्न हे पूर्णब्रह्म, असं ऐकत आपण सगळे मोठे झालो. पण या देवासमान अन्नामध्ये दडलेल्या तेहेतीस कोटी छटा यांची ओळख कधी बरं झाली? भारताबाहेर पडल्यावर, भारतीय जेवण म्हणजे पंजाबी जेवण अशा ओळखींमधून बाहेर येता येता आपण दक्षिण भारतीय जेवणाच्या वळणाला लागून आत्ता कुठं थोडं फार मराठमोळ्या पक्वांनांपर्यंत व्याख्या रुंदावू शकलोय. पण याच्याही पलीकडे आपण जे खातो, जसे खातो, त्याचा इतिहास, त्याचा लहेजा, त्यामागच्या रूढी आणि परंपंरा उलगडून दाखवणारा, त्याची माहिती जाणून घ्यायला उत्सुक करवणारा उपक्रम राबवणारी व्यक्ती म्हणून प्रीती आणि राजेश देव यांची ओळख. त्यांच्या याच उपक्रमाबद्दलची अधिक माहिती, त्यामागची प्रेरणा आणि त्यांना आलेले अनुभव जाणून घेणे हा यंदाच्या एपिसोडचा उद्देश.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
या भागात आलेले संदर्भ:
रुचिरा / Julie & Julia / नल पाकदर्पण / भोजनकुतूहलम / सूपशास्त्र / Paat Paani
दीन मोहम्मद शेख / आजीबाई बनारसे / वेणूताई चितळे
मनोज वसईकर / पूर्णब्रम्ह (जयंती कठाळे) / Chef's Table
Shank's (film) / भारतीय पाककृतींची अन्नयात्रा
Ethopian Cuisine in Spitalfields Market / झोमॅटो-स्विगी ची चलती
S1.E6: Efforts behind the fund raising
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
11/21/21 • 35 min
कोरोनाव्हायरसमुळे जगभर आलेल्या महामारीतून मार्ग काढण्यासाठी, खूप लोकांनी, संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. जशा जमेल त्या पद्धतीने लोक एकत्र आले, आणि त्यांनी हे शक्य करून दाखवलं. हा प्रवास अजून संपलेला नाही. पण तरीही आता शेवट दृष्टीक्षेपात येतोय असं वाटतंय.
यामध्ये, पैसे उभं करण्याचं काम, मदत पोचवण्याचं काम सागरने बघितलं. स्वतः जबाबदारी उचलली. तर या भागामध्ये त्याच्याकडून त्याचा अनुभव ऐकुया.
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
#fundraising #covid #maharashtra #relief
दुसऱ्या सत्राची नांदी (रोहित)
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
01/10/22 • 1 min
गेल्या तीन महिन्यात आपण दर रविवारी भेटत आलो. २०२१ सोबत आपण मेतकूट पॉडकास्टच्या पहिल्या सत्राची सांगता सुद्धा केली. या प्रवासात आत्तापर्यंत तुम्ही दिलेली साथ, सल्ले, सूचना, आणि महत्वाचं म्हणजे प्रतिक्रिया खूपच आवडल्या. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप आभार.
आता as promised, आम्ही मेतकूट पॉडकास्टचे दुसरे सत्र तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी सज्ज आहोत. जशी साथ, जे प्रेम तुम्ही गेल्या तीन महिन्यात दिलं, ते वृद्धिंगत होईल ही आशा करतो. लवकरच नवे भाग प्रदर्शित करू. त्यासाठी पॉडकास्टच्या चॅनेलला spotify, apple podcast, google podcast किंवा youtube यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे subscribe करून ठेवा. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल.
यंदाच्या सत्रामध्ये आमच्या काही मित्र मैत्रिणींना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेले आहे. त्यांच्या आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम, आणि म्हणून घडलेला त्यांचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा मानस आहे. यातून ज्या काही गप्पा जमल्या, त्यांची सरमिसळ करून बनलेलं हे मेतकूट. हे लोक कोण आणि त्यांचे विषय कोणते हे लवकरच सांगू.
सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा Twitter: @metkootPodcast / Facebook: @MetkootPodcast / Instagram: @metkootpodcast
मेतकूट च्या दुसऱ्या पर्वाची नांदी | Season 2 Teaser
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
01/02/22 • 1 min
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
मेतकूट च्या पहिल्या सत्राला मिळालेला प्रतिसाद पाहता आम्हांला दुसऱ्या पर्वाची तयारी करण्यासाठी उत्साह संचारला आहे. लवकरच भेटू पुढच्या आठवड्यापासून दर रविवारी एका नवीन भागात, एका नवीन स्वरूपात काही इंटरेस्टिंग पाहुणे मंडळींना सोबत घेऊन.
तुमच्या आवडीच्या पॉडकास्ट माध्यमातून (Spotify, Apple Podcast / Google Podcast / Anchor) सब्सकाइब करा म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे भाग तुम्हाला पटकन ऐकता येतील.
सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा Twitter: @metkootPodcast / Facebook: @MetkootPodcast / Instagram: @metkootpodcast
S2.E1 - शिक्षणाची वाट शोधताना - केतन देशपांडे सोबत गप्पा
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
01/16/22 • 50 min
रस्ता लांबचा आहे.
पुस्तकी शिक्षणापासून ते कौशल्य आधारित शिक्षणापर्यंतचा आहे.
शिक्षणापासून नोकरीपर्यंतचा आहे.
कुठे आर्थिक प्रगतीचा आहे तर कुठे जगण्याच्या संघर्षाचा आहे.
माहितीचा महापूर किंवा दुष्काळ यापासून योग्य ती माहितीचा असण्याचा आहे.
या रस्त्यावर ठेच खाल्लेल्या पण त्यानंतर दुसऱ्यांना शहाणे करून सोडण्याचा संकल्प सोडलेल्या केतनशी आम्ही या भागात गप्पा मारल्या आहेत.
वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी Friends Union for Energising Lives (F.U.E.L.) ही NGO स्थापन करून भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्याही लाखो मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आत्मनिर्भर होण्यासाठी विश्वास देणारा असा हा केतन देशपांडे आता कौशल्य आधारित शिक्षणासाठी सुसज्ज असे विद्यापीठ पुण्यात लवकरच सुरु करतोय.
आजूबाजूच्या परिस्थितीला केवळ दोष देण्यापेक्षा आपल्या परीने शिक्षणाला केवळ नोकरी/उद्योगाशीच नाही तर जगण्याशी जोडून घेणारा केतनचा प्रवास, आणि त्याचे विचार नक्की ऐका. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे पण जरूर कळवा.
#youth_empowerment #social_entrepreneurship #STEM #शिक्षण #कौशल्य_आधारित_शिक्षण #रोजगार
या भागात आलेले संदर्भ:
Friends Union for Energising Lives
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी :
Facebook: https://www.facebook.com/MetkootPodcast
Instagram: https://www.instagram.com/metkootpodcast/
Twitter: https://twitter.com/metkootPodcast
https://www.youtube.com/watch?v=B7ytTj1ALdw
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
S1.E10 - अघळ पघळ
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
12/19/21 • 32 min
इतक्या आठवड्यात इतके विषय बघितले, मग उगाच असा विचार आला, थोडासा लाईट लिया जाये. म्हणून मग या आठवडयात बीना विषय भेटलो, गप्पा मारल्या. जुन्या लहानपणीच्या आठवणी असं घ्यायचं ठरलं होतं, पण त्याच जे काय झालं ते तुम्हाला कळेलच.
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
S2.E2 - Teaser (भाषेच्या नावानं चांगभलं)
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
01/22/22 • 0 min
भाषेच्या नावानं चांगभलं
अनेकांसाठी भाषा हा केवळ शाळेत शिकायचा विषय राहून जातो. पण त्यातल्या अनेक गमती जमाती आणि जगभरात भाषेमुळे झालेल्या उलथापालथी आपल्याला माहीतच नसतात. अशाच भन्नाट गोष्टींविषयी मेतकूट मराठी पॉडकास्ट वर गप्पा मारायला येत आहे Arnika Paranjape, जी भारतीय भाषाच नाही तर इंग्रजी, ग्रीक आणि पर्शियन भाषा सुद्धा अंगाखांद्यावर लीलया खेळवते.
पूर्ण एपिसोड लवकरच युट्युब आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट ॲपवर येत आहे. पटकन सब्सक्राईब करा म्हणजे पुढचा भाग मिस नाही होणार (आता हे वाक्य शुद्ध मराठीत म्हणून दाखवा)
युट्यूब किंवा https://anchor.fm/metkoot वर आपल्या आवडत्या पॉडकास्ट ॲपची लिंक सापडेल (spotify, apple podcast, google podcast)
Show more best episodes
Show more best episodes
FAQ
How many episodes does मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) have?
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) currently has 32 episodes available.
What topics does मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) cover?
The podcast is about Society & Culture, Personal Journals and Podcasts.
What is the most popular episode on मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)?
The episode title 'S2.E3 - व्हायरल नव्हे, व्हायटल - विनायक पाचलग बरोबर' is the most popular.
What is the average episode length on मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)?
The average episode length on मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) is 47 minutes.
How often are episodes of मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) released?
Episodes of मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) are typically released every 7 days.
When was the first episode of मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)?
The first episode of मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) was released on Oct 13, 2021.
Show more FAQ
Show more FAQ